अरुंधती केश
From Wikipedia, the free encyclopedia
अरुंधती केश (इंग्रजी: Coma Berenices; कोमा बेरनाइसेस) उत्तर खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. तो सिंह आणि भूतप यांच्या मध्ये आहे आणि दोन्ही गोलार्धातून दिसतो. याच्या पाश्चात्य नावाचा ग्रीक भाषेतील अर्थ "बेरनाइसचे केस" असा असा आहे. हे नाव ईजिप्तची राणी बेरनाइस दुसरी हिच्या नावावरून दिले गेले आहे. तिने धार्मिक कारणासाठी तिचे केस दान केले होते.
जलद तथ्य लघुरुप, प्रतीक ...
तारकासमूह | |
अरुंधती केश मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Com |
---|---|
प्रतीक | बेरनाइसचे केस |
विषुवांश |
११h ५८m २५.०८८५s– १३h ३६m ०६.९४३३s[1] |
क्रांती |
३३.३०३४३०३°– १३.३०४०४८५°[1] |
क्षेत्रफळ | ३८६ चौ. अंश. (४२वा) |
मुख्य तारे | ३ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ४४ |
ग्रह असणारे तारे | ५ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ० |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | १ |
सर्वात तेजस्वी तारा | β Com (४.२६m) |
सर्वात जवळील तारा |
β Com (२९.७८ ly, ९.१८ pc) |
मेसिए वस्तू | ८ |
उल्का वर्षाव | कोमा बेरेनिसिड्स |
शेजारील तारकासमूह |
शामशबल सप्तर्षी सिंह कन्या भूतप |
+९०° आणि −७०° या अक्षांशामध्ये दिसतो. मे महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
बंद करा
अरुंधती केश ५६ अंश दक्षिण अक्षांशाच्या उत्तरेकडील सर्व भागातून दिसते,[2] आणि २ एप्रिलच्या मध्यरात्री भूमंडलावर येते.[3] आकाराने मोठे नसले तरी याच्यामध्ये एक दीर्घिकांचा महासंघ, दीर्घिकांचे दोन संघ, एक तारकागुच्छ आणि आठ मेसिए वस्तू आहेत