कोरियन कला
From Wikipedia, the free encyclopedia
कोरियन कले मध्ये सुलेखन, संगीत, चित्रकला आणि कुंभारकामातील परंपरेचा समावेश आहे, बहुतेकदा नैसर्गिक प्रकार, पृष्ठभाग सजावट आणि ठळक रंग किंवा आवाज यांचा वापर करून गोष्टी चिन्हांकित केल्या जातात.
कोरियन कलेची सर्वात प्राचीन उदाहरणे ३००० ईसापूर्व काळातील पाषाणयुगाची आहेत .[1] यामध्ये प्रामुख्याने मातीयुक्त शिल्प आणि पेट्रोग्लिफचा समावेश आहे.
या सुरुवातीच्या काळात विविध कोरियन राज्ये आणि राजवंशांच्या कला शैली उदयास आल्या. कोरियन कलाकारांनी कधीकधी साध्या अभिजातपणा, उत्स्फूर्तपणा आणि निसर्गाच्या शुद्धतेबद्दल कौतुक असलेल्या मूळ परंपरासह चीनी परंपरा सुधारल्या.
गोरीयो राजवंश (९१८ ते १३९२) या काळात कोरियन कला मोठ्या प्रमाणात वृधिंगत झाली, विशेषतः कुंभारकामाची कलेसाठी हा कालावधी सहाय्यक ठरला.
कोरियन आर्ट मार्केट हे सोलच्या इंसाडॉंग जिल्ह्यात स्थित आहे. येथे ५०हून अधिक छोट्या छोट्या गॅलरींमधून कलेचे प्रदर्शन होत असतात. अधूनमधून अशा कलाकृतींचे लिलाव होत असतात. गॅलरी सहकार्याने चालवल्या जातात. लहान आणि बऱ्याचदा छान सजवलेले आणि बारीक डिझाइन असलेल्या गोष्टींचे प्रदर्शन भरवत असतात. प्रत्येक गावात त्यांच्या स्वतःच्या छोट्या प्रादेशिक गॅलरी असतात. यामध्ये स्थानिक कलाकार पारंपारिक आणि समकालीन माध्यमांमध्ये कलेचे प्रदर्शन करत असतात. आर्ट गॅलरीमध्ये सहसा माध्यमांचे मिश्रण असते. पश्चिमेकडील कला अधिक ठळकपणे आणण्याच्या प्रयत्नांना सहसा कोरियाबाहेर म्हणजे न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लंडन आणि पॅरिस येथे यश मिळते.