गांधी जयंती

महात्मा गांधींचा जन्मदिवस From Wikipedia, the free encyclopedia

गांधी जयंती
Remove ads

गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.[] गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.[]

Thumb
१२ ऑक्टोबर १९३९ रोजीचे महात्मा गांधी यांचे छायाचित्र

महत्त्व

महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.[] भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.[] त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते.

स्वरूप

गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीयांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांची आठवण करणे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शाळा- महाविद्यालये येथे स्पर्धाचे आयोजन करणे, पदयात्रा, व्याख्याने यांचे आयोजन, मान्यवर वक्त्यांची आणि अभ्यासक यांची भाषणे आयोजित करणे अशा उपक्रमांची योजना केली जाते.[] महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना फुले वाहून त्यांचे स्मरण केले जाते.

Thumb
२०१६ साली भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी गांधीजी यांच्या समाधी स्थळावर
Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads