झीरो ए.डी.
From Wikipedia, the free encyclopedia
झीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[1]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स व लिनक्स यावर खेळता येतो.[2] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टने बनवलेल्या एज ऑफ एम्पायर्स खेळापासून स्फुरण घेऊन इ.स. २००० सालापासून झीरो ए.डी. विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[3]
झीरो ए.डी. | |
---|---|
विकासक | वाइल्डफायर गेम्स |
प्रकाशक | वाइल्डफायर गेम्स |
रचनाकार | ओम्री लाहाव |
इंजिन | पायरोजेनेसिस |
प्लॅटफॉर्म | विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स |
पूर्वावलोकन आवृत्ती | अल्फा २२ व्हीनस्टास / नोव्हेंबर ८, २०१६ |
प्रकार | वास्तव-काल डावपेच |
खेळण्याचे प्रकार | एक-खेळाडू, अनेक-खेळाडू |
माध्यमे/वितरण | उतरवणे |