विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |
- स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
- १) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते
२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.
४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.
५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
- १) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[1] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.
- २) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.
- ३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.
- ४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.
- आपल्याला माहित आहे का ? की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.
- ५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
- १) आपण मराठी विकिपीडियावर यापुर्वी छायाचित्रे चढवली आहेत का ? तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत हि तुमची स्वत:ची आणि तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी आहे हे अक्षात घ्यावे. आणि
- २) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि
- ३) मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)
- आपण उपरोक्त तीन निकष पूर्ण करत असल्यास, विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#प्रचालकांना विनंत्या येथे संचिका चढवू देण्या विषयी विनंती नोंदवावी. प्रचालक त्यांच्या सवडीनुसार स्थानिक संचिका अपभारणाचे पर्याय पात्र सदस्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील.
- स्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील ? :
- प्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का? 1]संचिका चढवायला हरकत नाही.
- प्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का? 2] [1]
- प्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.
- मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.
- असे का ?
- केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.
- Section 2(2) of the Criminal Law Amendment Act, 1961 as amended by Criminal Law Amendment (Amending) Act, 1990. It reads as under:-
- 1. Questioning the territorial integrity or frontiers to the interests of safety and security of India.-(1) Whoever by words either spoken or written, or by signs, or by visible representation or otherwise, questions the territorial integrity or frontiers of India in a manner which is, or is likely to be, prejudicial to the interests of the safety or security of India, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.
- (2) Whoever publishes a map of India, which is not in conformity with the maps of India as published by the Survey of India, shall be punishable with imprisonment which may extend to six months, or with fine, or with both.
- (3) No court shall take cognizance of an offence punishable under Sub-section (2), except on a complaint made by the Government."
- 1. Questioning the territorial integrity or frontiers to the interests of safety and security of India.-(1) Whoever by words either spoken or written, or by signs, or by visible representation or otherwise, questions the territorial integrity or frontiers of India in a manner which is, or is likely to be, prejudicial to the interests of the safety or security of India, shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.