एकनाथ शिंदे
भारतीय राजकारणी (जन्म १९६४) / From Wikipedia, the free encyclopedia
एकनाथ संभाजी शिंदे (९ फेब्रुवारी १९६४ - हयात) हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत.[ संदर्भ हवा ] बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेतदाखल झाले होते. जून २०२२ मध्ये त्यांनी महविकास आघाडीचे सरकार असलेल्या शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला असून सध्या ते या गटाचे प्रमुख आहेत.[ संदर्भ हवा ] भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसेना शिंदे गटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन करून या सरकार मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले.[ संदर्भ हवा ]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एकनाथ संभाजी शिंदे | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० जून २०२२ | |
राज्यपाल | रमेश बैस |
---|---|
मागील | उद्धव ठाकरे |
जन्म | ९ फेब्रुवारी, १९६४ (1964-02-09) (वय: ५९) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना |
पत्नी | लता एकनाथ शिंदे |
अपत्ये | श्रीकांत एकनाथ शिंदे |
निवास | ठाणे |
शिक्षण | बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) |
धर्म | हिंदू |