ओडिशा
भारतातील एक राज्य. / From Wikipedia, the free encyclopedia
ओड़िशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला असून त्याच्या दक्षिणेला व आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर, पूर्वेला व ईशान्य दिशेला पश्चिम बंगाल , उत्तरेला झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण आणि दक्षिणेला व नैर्ऋत्य दिशेस आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ओड़िशा ଓଡ଼ିଶା | |
भारताच्या नकाशावर ओड़िशाचे स्थान | |
देश | भारत |
स्थापना | १ एप्रिल इ.स. १९३६ |
राजधानी | भुवनेश्वर |
सर्वात मोठे शहर | भुवनेश्वर आणि कटक |
जिल्हे | ३० |
क्षेत्रफळ | १,५५,७०७ चौ. किमी (६०,११९ चौ. मैल) (९ वा) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
४,१९,४७,३५८ (११वा) - २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) - उच्च न्यायालय |
प्रो. गणेशलाल नवीन पटनायक ओडिशा विधानसभा (१४७) ओडिशा उच्च न्यायालय |
राज्यभाषा | ओड़िया |
आय.एस.ओ. कोड | IN-OR |
संकेतस्थळ: http://www.odisha.gov.in/ |
ओड़िशाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
पुरी, ओड़िशा येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणामध्ये वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा पुळण आहे.