सेबास्टियान फेटेल
From Wikipedia, the free encyclopedia
सेबास्टियान फेटेल (जर्मन: Sebastian Vettel ; जर्मन उच्चारण: zeˈbasti̯an ˈfɛtəl) (३ जुलै, इ.स. १९८७ ; हेपेनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी - हयात) हा फॉर्म्युला वन शर्यतींमधील चालक आहे. सध्या (इ.स. २०११) रेड बुल रेसिंग संघाचा चालक व २०१०, २०११, २०१२ व २०१३ ह्या सलग चार हंगामांचा विजेता आहे. २००९ च्या मोसमात सेबास्टियान फेटेल ने आपल्या फॉर्म्युला वन कारकिर्दीची सुरुवात केली. रेड बुल रेसिंग संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाच्या दौडीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. असे करणारा तो सर्वात कमी वयाचा चालक ठरला. तसेच रेड बुल संघासाठी त्यांचे पहिले पोल स्थान आणि पहिला शर्यत विजय ही मिळवला. त्यानंतरच्या मोसमातच सर्वात कमी वयाचा फॉर्म्युला वन विश्व विजेता चालक बनण्याचा मान त्याने पटकावला. पहिल्या अजिंक्यपदानंतर २०११, २०१२ व २०१३ च्या मोसमात त्याने पुन्हा फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाला गवसणी घातली.
सेबास्टियान फेटेल | |
---|---|
२०१७ मलेशियन ग्रांप्री दरम्यान फेटेल. | |
जन्म |
३ जुलै, १९८७ (1987-07-03) (वय: ३६) हेप्पनहाइम, हेसेन, पश्चिम जर्मनी |
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द | |
एकूण स्पर्धा | १२० |
अजिंक्यपदे | ४ (२०१०, २०११, २०१२, २०१३) |
एकूण विजय | ५३ |
एकूण पोडियम | १२० |
एकूण कारकीर्द गुण | २,९८५ |
एकूण पोल पोझिशन | ५७ |
एकूण जलद फेऱ्या | ३८ |
पहिली शर्यत | २००७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री |
पहिला विजय | २००८ इटालियन ग्रांप्री |
अखेरची विजय | २०१९ सिंगापूर ग्रांप्री |
अखेरची शर्यत | २०१९ अबु धाबी ग्रांप्री |
अखेरचा हंगाम | २०१९ |