होनाजी बाळा
मराठी शाहीर, कवी / From Wikipedia, the free encyclopedia
होनाजी बाळा (इ.स. १७५४ - इ.स. १८४४) होनाजी सयाजी शिलारखाने व बाळा कारंजकर या दोन व्यक्ती होत्या पण एकाच नावाने ओळखल्या जातात. दोघेही पुण्याचे रहिवासी होते. होनाजींचे घराणेच शाहिरांचे व पिढीजात कवित्व करणारे होते. त्यांचे आजोबा सातप्पा शिलारखाने हे पेशव्यांचे आश्रित व नावाजलेले तमासगीर होते. होनाजी आणि त्याचा मित्र बाळा यांनी होनाजी बाळा या जोडनावानी कवने गायली. होनाजी लिहायचा व बाळा गायचा. होनाजींच्या अनेक लावण्या रागदारीवर आधारित होत्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचनाही त्यांनी केली.
जलद तथ्य होनाजी बाळा, निवासस्थान ...
होनाजी बाळा | |
---|---|
निवासस्थान | पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | होनाजी-बाळा |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा |
|
प्रसिद्ध कामे | घनश्याम सुंदरा (भूपाळी) |
धर्म | हिंदू |
बंद करा
होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी मराठी संस्कृतीत अजरामर झाली.