अंगारा नदी
From Wikipedia, the free encyclopedia
अंगारा (रशियन: Ангара́) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील नदी येनिसेची प्रमुख उपनदी आहे. अंगारा नदी बैकाल सरोवरामध्ये उगम पावते. तेथून प्रथम उत्तरेस व त्यानंतर पश्चिमेस वाहत जाऊन ती येनिसे नदीला मिळते. एकूण १,७७९ किमी लांबीची अंगारा ही रशियातील सर्वात लांबीच्या नद्यांपैकी एक असून अंगारा, येनिसे व बैकालला पुरवठा करणारी सेलेंगा ह्या तीन नद्या मिळून जगातील सर्वात मोठ्या पाणलोट क्षेत्रांपैकी एक निर्माण झाले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जलद तथ्य अंगारा Ангара́, उगम ...
अंगारा Ангара́ | |
---|---|
अंगारा नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | बैकाल सरोवर |
मुख | येनिसे नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | १,७७९ किमी (१,१०५ मैल) |
उगम स्थान उंची | ४५६ मी (१,४९६ फूट) |
सरासरी प्रवाह | ३,४१६ घन मी/से (१,२०,६०० घन फूट/से) |
ह्या नदीस मिळते | येनिसेची |
बंद करा
रशियाच्या इरकुत्स्क ओब्लास्त व क्रास्नोयार्स्क क्राय ह्या प्रदेशांमधून वाहणाऱ्या अंगारावरील इरकुत्स्क हे सर्वात मोठे शहर आहे. येनिसेच्या दक्षिण व मध्य भागात जलविद्युतनिर्मिती करणारी अनेक मोठी धरणे बांधली गेली आहेत.