अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचे अधुकृत चलन From Wikipedia, the free encyclopedia
अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.
United States dollar US$ | |
---|---|
ISO 4217 | |
Code | USD (numeric: 840) |
Subunit | ०.०१ |
चलनाचे विभाजन | |
Subunit | |
१०० सेंट | {{{subunit_name_1}}} |
Banknotes | $१, $२, $५, $१०, $२०, $५०, $१०० |
Coins | १¢, ५¢, १०¢, २५¢, ५०¢, १$ |
भौगोलिक माहिती | |
User(s) | अमेरिका |
१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज [1] इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते [2].
अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.