इन्यो काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
इन्यो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इंडिपेंडन्स येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील इन्यो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इन्यो (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,०१६ इतकी होती.[2]
या काउंटीची रचना १८६६मध्ये झाली. या काउंटीला तिंबिशा भाषेतील इन्नियुन (ते धोकादायक आहे) या शब्दप्रयोगावरून दिलेले आहे.[3]
अमेरिकेच्या ४८ राज्यांमधील सगळ्यात खोल ठिकाण बॅडवॉटर बेसिन (समुद्रसपाटीखाली ८५.५ मीटर) आणि सगळ्यात उंच ठिकाण माउंट व्हिटनी (समुद्रसपाटीच्या वर ४,४२१ मीटर) ही दोन्ही ठिकाणे इन्यो काउंटीत एकमेकांपासून फक्त १४५ किमी अंतरावर आहेत.