एक मांसाहारी सस्तन प्राणी From Wikipedia, the free encyclopedia
खोकड ( शास्त्रीय नावः Vulpes bengalensis (व्हल्पिस बेंगॉलेन्सिस); इंग्रजी:Bengal Fox ( बेंगाल फॉक्स );) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. मांसाहारी गणातील ज्या कुलातला कोल्हा आहे त्याच कॅनिडी कुलातील हा प्राणी आहे.
खोकड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
Vulpes bengalensis | ||||||||||||
आढळप्रदेश | ||||||||||||
Vulpes bengalensis | ||||||||||||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्याचे डोके आणि धड मिळून लांबी ४५–६० सेंमी.; शेपूट २५–३५ सेंमी.; वजन २–३ किग्रॅ. असते. आकाराने लहान व सडपातळ; पाय बारीक; शेपटीचे टोक काळे; शरीराचा रंग करडा किंवा राखी; डोके, मान आणि कानाची मागची बाजू पुसट काळसर; थंडीत याचा रंग पांढुरका होतो पण पाय तांबूसच असतात. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते.
खोकड मोकळ्या मैदानात राहतो; दाट जंगलात तो नसतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडपे असलेल्या भागात तो नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंवा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. बिळात पाणी साठेल असे वाटले, तर लहानशा टेकाडावर तो बीळ करतो. बिळात ६०–९० सेंमी. खोलीवर एक दालन असते; बिळाला अनेक वाटा असतात, काही बंद तर काही दालनात जातात. खोकड निशाचर आहे; दिवसा तो झोप घेतो व तिन्हीसांजेनंतर भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक हा खातो. कलिंगडे, बोरे आणि हरबऱ्याचे घाटे देखील तो खातो. कोंबड्यांवर हा क्वचितच हल्ला करतो. उंदीर व खेकडे यांचा नाश करीत असल्यामुळे हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.[2]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.