गॅलिलियन उपग्रह
From Wikipedia, the free encyclopedia
१६१० मध्ये गॅलिलियोने दूर्बिणीद्वारे आयो, युरोपा, गनिमिड व कॅलिस्टो या गुरूच़्या चार नैसर्गिक उपग्रहांचा शोध लावला. या उपग्रहांना आता गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. पथ्वीसोडून इतर ग्रहांच्या उपग्रहांचे हे पहिले निरिक्षण मानले जाते. मात्र, चिनी खगोलशास्त्राचा इतिहासकार झी झेझोंग याच्या मते, गॅलिलियोच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वीच गुरूच्या एका ग्रहाचा शोध चिनी खगोलशास्त्रज्ञ गान डे याने इसवीसन पूर्व ३६२ मध्ये दूर्बिणीविना लावला होता.[1][2]