वेलवर्गीय औषधी वनस्पती / From Wikipedia, the free encyclopedia
गोराडू (इं.: व्हाइट यॅम, ग्रेटर यॅम लॅ.: डायॉस्कोरिया ॲलाटा) हा कोनफळाचा एक प्रकार आहे. याची वेल सुमारे १५ मीटर उंच वाढणारी असून वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) प्रकारची असते.[1][2]
गोराडू (मातीचा प्रकार) याच्याशी गल्लत करू नका.
Dioscorea alata (es); Ubi badak (ms); Ube (bcl); Dioscorea alata (en-gb); Dioscorea alata (bg); A̱nalu (kcg); Dioscorea alata (tr); 香芋 (zh-hk); ʻUfi (to); Ube (sk); Dioscorea alata (oc); Àbànà (ig); 香芋 (zh-hant); Dioscorea alata (io); 열대둥근마 (ko); Ube-ignamo (eo); smldinec křídlatý (cs); Dioscorea alata (an); গাছ আলু (bn); Dioscorea alata (fr); Uwi (jv); गोराडू (mr); Khoai mỡ (vi); Dioscorea alata (pt-br); Ufi (ty); Dioscorea alata (en); ديسقوريا جناحية (ar); 香芋 (yue); રતાળુ (gu); Dioscorea alata (eu); Dioscorea alata (ast); Dioscorea alata (ru); Dioscorea alata (de); Dioscorea alata (ga); دیسکورای بالدار (fa); 参薯 (zh); Nyuwɔɣu (dag); ダイジョ (ja); Dioscorea alata (ia); Sakata (ha); ديسقوريا جناحيه (arz); Dioscorea alata (ie); יאם סגול (he); Dioscorea alata (la); పెండలం (te); Dioscorea alata (fi); Dioscorea alata (en-ca); செவ்வள்ளிக் கொடி (ta); Dioscorea alata (it); Dioscorea alata (pt); Dioscorea alata (vo); Dioscorea alata (tanom) (ceb); Uwi (id); Dioscorea alata (war); Dioscorea alata (sv); Ube (tl); 大薯 (zh-tw); Dioscorea alata (sq); มันเสา (th); Pochrzyn skrzydlaty (pl); കാച്ചിൽ (ml); Dioscorea alata (nl); Obi (mad); Dioscorea alata (ext); खमरुआ (mai); Dioscorea alata (ro); Dioscorea alata (gl); Dioscorea alata (uk); 香芋 (zh-hans); Dioscorea alata (ca) especie de plantas (es); উদ্ভিদের প্রজাতি (bn); છોડની જાતો (gu); taimeliik (et); բույսերի տեսակ (hy); especie de planta (ast); espècie de planta (ca); वेलवर्गीय औषधी वनस्पती (mr); Art der Gattung Yams (Dioscorea) (de); loài thực vật (vi); lloj i bimëve (sq); گونهای از دایوسکوریا (fa); вид растение (bg); marga umbi-umbian (id); specie de plante (ro); spesies tumbuhan berumbi (ms); species of plant (en); вид растений (ru); sladký fialový zemiak (sk); สปีชีส์ของพืช (th); ചെടിയുടെ ഇനം (ml); soort uit het geslacht yam (nl); вид рослин (uk); speco di planto (io); מין של צמח (he); نوع من النباتات (arz); especie de planta (gl); نوع من النباتات (ar); druh rostliny (cs); 一种维管植物 (zh) Kambar, Igname ailé, Igname Saint-Martin, Cambar, Cambarre (fr); 大薯, ベニヤマイモ, ウォーター・ヤム, タイワンヤマイモ, 台湾山芋, オキナワヤマイモ, 田薯, 紅山芋, パープルヤム, 沖縄山芋, シンショ, 参薯, パープル・ヤム, デンショ, ウォーターヤム, ダイショ (ja); Dioscorea alata (to); 香芋, 茎翅薯蓣, 翅茎薯蓣(山药), 田薯, 翅茎薯蓣, 翅茎薯蓣(山药), 山药, 毛薯, 理毛条, 脚板薯, 云饼山药, 大薯 (zh); Ubi kelapa (id); Ignam skrzydlaty, Pochrzyn skrzydlasty, Dioscorea alata (pl); Ubi (tl); Purple yam (ig); Ubi besar, Ubi jawa, Ubi kelebang, Ubi kenduduk, Ubi menjangan, Ubi nasi, Ubi tiang (ms); 紫薯, 田薯, 罐薯 (zh-tw); Củ cầm, Củ cái, Khoai tía, Khoai tím, Củ đỏ, Củ mỡ, Dioscorea alata, Khoai ngọt, Khoai ngà, Khoai trút, Củ tía, Khoai long, Khoai bướu, Khoai vạc (vi); 자색마, 우베 (ko); purple yam, ube, greater yam (en); يام أرجواني, اليام الأرجواني (ar); sladký fialový brambor, ube (cs); মেটে আলু, চুপরি আলু, মাচা আলু, মোম আলু (bn)
डायोस्कोरिया अलाटा हे या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आहे जे या वनस्पतीशी संबंधित आहे. डायोस्कोरेसी कुटुंब. इंग्रजीमध्ये याला पर्पल याम, ग्रेटर याम, गयाना ॲरोरूट, टेन-मंथ्स याम, वॉटर याम, व्हाईट याम, विंग्ड याम किंवा फक्त याम म्हणतात. याची
वेल एका हंगामात उत्पादन घेतल्यानंतर मरते; पुढील वर्षी जमिनीतील कंदातून नवीन कोंब परत वाढतो. त्याच्या देठावर लहान गडद जांभळ्या रंगाचे कंद आणि भूगर्भात मोठा तपकिरी कंद वाढतो. दोन्ही कंद मातीत लावल्यास त्यापासून नवीन वेली उगवतात. तसेच हे दोन्ही प्रकारचे कंद खाण्यायोग्य असतात. ते शिजवून खाल्ले जातात. या वेलीची कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता पडत नाही..[3][2]
या वेलीचे मूळस्थान आग्नेय आशिया असून संपूर्ण उष्ण कटिबंधात तिची लागवड करतात. भारतात हीची अनेक ठिकाणी लागवड होते. डायॉस्कोरिया पार्सिमिलिस व डायॉस्कोरिया हॅमिल्टोनी या रानटी जातींशी हिचे जवळचे नाते आहे. हिचे सुमारे ७२ प्रकार ओळखले गेले आहेत. खोड चौकोनी व काहीसे सपक्ष असून डावीकडून उजवीकडे वेढे देत इतर झाडांवर चढते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित एकाआड एक असून पात्यांमध्ये पाच मुख्य शिरा तळाकडून टोकाकडे जातात. फुले एकलिंगी फळे (बोंडे) सपाट व बी सपक्ष असते. पानांच्या बगलेत अनेक आकार-प्रकारच्या कंदिका (लहान कंद) येतात. जमिनीत विविध प्रकारची ग्रंथिल मुळे (घनकंद) येतात. तपकिरी रंगापासून ते गर्द काळ्यापर्यंत अनेक छटा त्यांवर आढळतात. ती खाद्य आहेत. काही प्रकारांत त्यांची लांबी १·८५-२·५० मी, आढळते त्यांतील पिठूळ मगज (गर) नरम, पांढरा किंवा मलईसारखा, जांभळट किंवा लालसर असतो, त्यात २१ टक्के स्टार्च असतो. ही मुळे वाळवून व पीठ करून अथवा बटाट्यासारखी भाजी करून किंवा तळून खातात. वन्य जमाती भाताऐवजी खातात. जांभळट रंगाच्या मुळाचा उपयोग आइसक्रीमला रंग व स्वाद आणण्यासाठी करतात. ही मुळे कृमिनाशक असून महारोग, मूळव्याध व परमा इत्यादींवर वापरतात.[2]
गोराडूची लागवड सुरण, आले किंवा हळदीच्या पिकात मिश्रपीक म्हणून करतात किंवा स्वतंत्र पीक म्हणूनही लावतात. गुजरातमध्ये याची लागवड बरीच होते.[2]
गोराडूला १००–१५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाला ६० सेंमी. खोल, मध्यम काळी किंवा रेतीमिश्रित पोयट्याची जमीन उत्तम समजतात. भारी चिकण जमिनीत ग्रंथिल मुळे चांगली पोसत नाहीत.[2]
लागवडीपूर्वी जमीन २०-२२ सेंमी. खोल नांगरून, ढेकळे फोडून हेक्टरी २५-३० टन भरखत घालून, वखरपाळ्या देऊन, चांगली नरम आणि भुसभुशीत करतात. रेताड जमिनीत स्वतंत्र पिकांसाठी वाफे व भारी प्रकारच्या जमिनीत रुंद वरंबे करतात. मिश्रपिकाच्या बाबतीत मुख्य पिकासाठी काढलेल्या सऱ्यांचा उपयोग केला जातो.[2]
गोरडूच्या कंदात २१ टक्के कार्बोहायड्रेट (स्टार्च), ७३ टक्के पाणी असते. याचे तुकडे करून तेलात तळून, उकडून किंवा निखाऱ्यावर भाजून खाल्ले जातात. तसेच आयुर्वेदिक औषधीसाठी याचे वाळवून चूर्ण केले जाते. याच्या स्टार्चचा कच्चा माल म्हणून अल्कोहोल बनवण्यासाठी वापर केला जातो.