![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d3/Chandra_Shekhar_Singh_2010_stamp_of_India.jpg/640px-Chandra_Shekhar_Singh_2010_stamp_of_India.jpg&w=640&q=50)
चंद्रशेखर
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे.
- क्रिकेट खेळाडू चंद्रशेखरविषयीचा लेख येथे आहे.
- कवी चंद्रशेखर यांच्याविषयीचा लेख येथे आहे.
चंद्रशेखर सिंग | |
[[चित्र:![]() | |
८वे भारतीय पंतप्रधान | |
कार्यकाळ नोव्हेंबर १०,इ.स. १९९० – जून २१, इ.स. १९९१ | |
राष्ट्रपती | रामस्वामी वेंकटरमण |
---|---|
मागील | विश्वनाथ प्रताप सिंग |
पुढील | पी. वी. नरसिंहराव |
जन्म | जुलै १, इ.स. १९२७ इब्राहीमपट्टी, बालिया जिल्हा, उत्तरप्रदेश |
मृत्यू | जुलै ८, इ.स. २००७ नवी दिल्ली, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | जनता दल समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) |
अपत्ये | नीरज शेखर |
गुरुकुल | अलाहाबाद विद्यापीठ |
धर्म | हिंदू |
सही | ![]() |
चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही.[1] त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते.[2][3][4][5] मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली.[6][7][8] १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[9][10]