From Wikipedia, the free encyclopedia
चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.
चकली बनविण्यासाठी तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुऊन वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ, तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोऱ्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो. चकली ही मैद्याची पण करतात. ही चकली पण चवीला छान लागते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.