चालुक्य राजघराणे
प्राचीन क्षत्रिय मराठा राजवंश / From Wikipedia, the free encyclopedia
मराठा चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन मराठा राज्यकर्ते होते. पट्टदकल किंवा वातापी (बदामी) ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती
चालुक्य साम्राज्य मराठी साम्राज्य | |
---|---|
[[चित्र:| px]] | |
इ.स. ५४३ - इ.स. ७५३ | |
राजधानी | बादामी |
राजे |
इ.स. ५४३ - इ.स. ५६६: पुलकेशी पहिला इ.स. ६५५ - इ.स. ६८५: विक्रमादित्य पहिला इ.स. ७४६ - इ.स. ७५३: कीर्तीवर्मा दुसरा |
भाषा | मराठी, कन्नड |
क्षेत्रफळ | ११,००,००० वर्ग किमी |
ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात.