जाल (गणित)
From Wikipedia, the free encyclopedia
गणितात आणि मुख्यत्वे जालगणितात आणि जालशास्त्रात, जाल हे अशा वस्तुंच्या किंवा घटकांच्या संचाचे दर्शक असते ज्या वस्तु एकमेकांशी दुव्याने जोडलेल्या असतात. संचातील वस्तु शिरोबिंदुंच्या स्वरूपात दर्शविल्या जातात.[1]
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
जालाचे दुवे दिशीय किंवा अदिशीय असू शकतात. उदाहरणार्थ, जर जालातिल शिरोबिंदु फेसबुकची खाती दाखवत असतील आणि त्यांमधिल दुवे त्या व्यक्तिंमधील फेसबुकवरील मैत्रि दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे अदिशीय असणार कारण दोन्ही व्यक्ती फेसबुकवर एकमेकांचे मित्र असतात. असे होउ शकत नाही कि एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिची मित्र आहे परंतु दुसरी व्यक्ती पहील्या व्यक्तिची मित्र नाही. याउलट जर जालातिल शिरोबिंदु विविध प्राणि दाखवत असतिल आणि त्यांमधिल दुवे कोणता प्राणि कोणत्या प्राण्याचे भक्ष आहे हे दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे दिशीय असणार कारण शक्यतो असे होत नाही कि एक प्राणि दुसऱ्याचे भक्ष असेल तर दुसरा प्राणिदेखिल पहिल्याचे भक्ष आहे. ज्या जालातिल दुवे अदिशीय आहेत अशा जालाला अदिशीय जाल तर ज्या जालातिल दुवे दिशीय आहेत अशा जालाला दिशीय जाल असे म्हटले जाते.