डोडो
मॉरिशसमधून नामशेष झालेले मोठे उड्डाणविरहित कबूतर / From Wikipedia, the free encyclopedia
डोडो हा एक नामशेष झालेला न उडणारा पक्षी होता. तो हिंदी महासागरातील मॉरिशस या बेटावर आढळत असे. जरी डोडोला उडता येत नसे, तरी आनुवांशिकतेने तो कबुतरांच्या जास्त जवळचा होता.
जलद तथ्य डोडो, प्रजातींची उपलब्धता ...
डोडो | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
डोडो | ||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||
नामशेष | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
Raphus cucullatus | ||||||||||||||
बंद करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे. रॅफस क्युक्युलेटस, रॅफस सॉलिटेरस आणि पेझोफॅप्स सॉलिटेरिया अशा त्यांच्या तीन जाती असून हिंदी महासागरातील अनुक्रमे मॉरिशस, रीयुनियन आणि रॉड्रिगेस बेटांवर त्यांचा अधिवास होता. कबुतराचा हा नातेवाईक होता, असे मानले जाते. पोर्तुगीजांनी १५०७ मध्ये डोडो पाहण्यापूर्वी त्यांचा या बेटांवर हजारो वर्षांपासून अधिवास होता. या काळात त्यांना कोणी नैसर्गिक शत्रू नसल्यामुळे हा पक्षी आकाराने वाढत गेला आणि त्याची उडण्याची क्षमता नाहीशी झाली.