तेजोमेघ
From Wikipedia, the free encyclopedia
तेजोमेघ (इंग्लिश: Nebula; नेब्युला) हा धूळ, हायड्रोजन, हेलियम व आयनित वायूंपासून बनलेला आंतरतारकीय मेघ असतो. सुरुवातीला हे नाव कोणत्याही मोठ्या अवकाशीय वस्तूस देण्यात येई, उदाहरणार्थ आकाशगंगाआकाशगंगेच्या पलीकडील दीर्घिका.
(देवयानी दीर्घिका ही एडविन हबल याने दीर्घिकांचा शोध लावण्यापूर्वी अँड्रोमेडा तेजोमेघ म्हणून ओळखली जाई.) तेजोमेघ बऱ्याचदा ताऱ्यांच्या निर्मितीची ठिकाणे बनतात. उदा. ईगल तेजोमेघ. ईगल तेजोमेघाचे छायाचित्र हे नासाच्या सर्वांत लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक आहे, "पिलर्स ऑफ क्रिएशन". (नवनिर्मितीचे स्तंभ) या भागांमध्ये वायू, धूळ व इतर घटक एकमेकांवर आदळून जास्त वस्तुमान तयार होते, जे आणखी वस्तुमान आकर्षित करते व शेवटी ते ताऱ्यांत रूपांतर होण्याइतके मोठे होते. उरलेल्या वस्तुमानाचे ग्रह व इतर ग्रहीय प्रणालीतील वस्तूंमध्ये रूपांतर होते.