From Wikipedia, the free encyclopedia
नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी (tribal ) जिल्हा आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. येथील लोकसंख्या १३,११,७०९ असून त्यांपैकी १५.४५% लोक शहरी भागात राहतात. (२००१ च्या जनगणनेनुसार). हा भाग आदिवासी बहुल असून निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे परिपूर्ण असा आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने काठीच्या आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणाऱ्या बाजारास भोंगऱ्या बाजार असे म्हणतात.
नंदुरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. 'याहाकी देवमोगरा माता' हे येथील आदिवासींचे प्रमुख टोटेम (कुलदेवी) आहे. शेजारील जिल्हे फक्त - धुळे
नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी (महाल/धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर असे ६ तालुके आहेत.
सातपुडा पर्वताच्या रांगेत हे गाव वसलेले आहे. येथे पाताळगंगा नावाची नदी आहे.
सातपुड्यातील तापी खोऱ्यात वसलेला नंदुरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा.(नाशिक प्रशासकीय विभागात.)
तापी नर्मदा ही मुख्य नदी. (इतर नद्या - नर्मदेश्वर उपनद्या उदई, देवनंद, आहेत गोमाई, पाताळगंगा, रंगवली, शिवण, वगैरे.)
मोलगी: सातपुडा पर्वतातील पर्यटकांना आकर्षित करणारा प्रसिद्ध बोरकी धबधबा हा देवनंद नदीवर उमटी गावात आहेत.
हजारो वर्षांपूर्वी तापी व रेवा (नर्मदा)नदीच्या मध्ये दाब नावाचे राज्य होते. आजही तो परिसर हेलोदाब म्हणून ओळखले जाते. तेथे राजाकोलपासा याचे राज्य होते. दाब राज्याच्या भोवताली असलेल्या प्रमुखांना एकत्र आणून त्यानी मोठे राज्य स्थापन केले होते. त्याभागातील ताब्यात असलेल्या भुभागाला पाटी (खोंड) म्हणून ओळखले जात असे. दाब या सांस्कृतिक केंद्रस्थाना पासून भोवताली चारही दिशांना आदिवासी बोली भाषेत खोंड (पाटी) म्हणून ओळखतात.त्याना नांवेही दिली आहे.[1] 'याहा देवमोगरा माता' हे येथील आदिवासींचे प्रमुख टोटेम कुलदेवी आहे. आदिवासी भाषेत याहा म्हणजे आई म्हणून देवमोगरा माता. नंदुरबार पूर्वी नंद्राज राजाचे राज्य होते, त्यामुळे हे शहर एकेकाळी नंद्रनगरी म्हणून ओळखले जात होते. येथील प्रमुख आदिवासींचा खूब मोठा इतिहास नंदुरबारला लाभला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा देताना इथे १९४२ साली शिरीष कुमार नावाचा नवयुवक सत्याग्रहादरम्यान पोलिसांची गोळी लागून हुतात्मा झाला. त्याच्या नावाने गावात हुतात्मा चौक आहे. नंदुरबार शहरालगत चौपाळे नावाचे एक खेडेगाव आहे. या गावात "संत दगाजी बापू" यांचा झाला. आजन्म ब्रह्मचारी राहून त्याने नंदुरबारला भक्तीचा मार्ग दर्शविला. लोक त्यांना 'बापू' म्हणूनच ओळखायला लागले. त्यांची कीर्ती उत्तर महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीनही राज्यात पसरलेली आहे.
नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा होता. परंतु पालिकेने जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल उभारल्याने हा पुतळा पालिकेच्या तत्पुरत्या इमारतीत एका बंदिस्त खोलीत ठेवला होता. नंतर तो मोकळ्या जागेत आणण्यात आला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.