पारसिक डोंगर
From Wikipedia, the free encyclopedia
पारसिकाचा डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साळशेत बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती.[1][2] या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळे या टेकडीचा आकार आणि उंची बदलले गेले आहेत. या डोंगरावरील १५ किमी२ परिसरात अभयारण्य आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.[3][4]
या डोंगराचा काही भाग नवी मुंबईमध्ये मोडतो. याच्या शिखराजवळ नवी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान आहे.[5]