मुहम्मद अली बोग्रा
From Wikipedia, the free encyclopedia
मुहम्मद अली बोग्रा (बंगाली: মোহাম্মদ আলী বগুড়া ; उर्दू: محمد علی بوگرہ ; रोमन लिपी: Muhammad Ali Bogra) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा तिसरा पंतप्रधान होता. इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ या कालखंडात तो पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९५५ साली पाकिस्तानाचा तत्कालीन गव्हर्नर जनरल इस्कंदर मिर्झा याने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडले.