लोनडेपो पार्क
From Wikipedia, the free encyclopedia
लोनडेपो पार्क तथा मार्लिन्स पार्क हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याील मायामी शहरात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलमधील मायामी मार्लिन्स संघाचे हे घरचे मैदान आहे.[1] या मैदानाला पूर्णपणे छत असून हे पाहिजे तेव्हा उघडता येते.
लोनडेपो पार्क मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी (२ मैल) पश्चिमेस आहे.