विकिपीडिया:नामविश्व
From Wikipedia, the free encyclopedia
मिडीयाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडीया संकेतस्थळ चालवण्यात येते) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे [[विकिपीडिया:नामविश्व]]. यात विकिपीडिया हे झाले नामविश्व तर नामविश्व हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान विकिपीडिया या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.
- हे विकिमिडिया या साहाय्य पानाचे भाषांतर आहे.या लेखाची विकिमिडिया येथील लेखाशी वेळोवेळी तुलना करून; हे पान मराठी विकिपीडियावर अद्ययावत ठेवण्यास मदत करा.
साधारणतः मिडियाविकि प्रणाली वापरणार्या विकिवर (उदाः मराठी विकिपीडिया) खाली दिल्याप्रमाणे १८ नामविश्वे असतात.
- मुख्य नामविश्व. यातील पानांना फक्त शीर्षक असते.
- इतर १५ नामविश्वे. यातील प्रत्येक पानांना शीर्षकाखेरीज विशिष्ट नाव असते. यातील दोन नामविश्वांना प्रकल्पाचीच (Projectsची) नावे असतात. मराठी विकिपीडियावर ही दोन नामविश्वे Wikipedia व Wikipedia:Talk अशी आहेत. येथे Projectचे नाव Wikipedia हे आहे.
- दोन टोपण-नामविश्वे.
या १८ नामविश्वांखेरीज प्रत्येक विकिपीडिया आपआपली स्वतंत्र व विशिष्ट अशी नामविश्वे तयार करू शकतात. इंग्लिश विकिपीडियात Portal: व Portal talk: ही या प्रकारची दोन नामविश्वे आहेत.
महत्त्वाचे:
- एखाद्या पानाच्या शीर्षकातील नामविश्वाचा उल्लेख हा आंतरविकि जोडण्यांशी संबंधित नाही.
- जर एखाद्या पानाच्या नावात अर्धविराम अथवा कोलन(:) असेल व अर्धविरामाच्या अलीकडील भाग त्या विकिपीडियावरील नामविश्वाचे नाव नसेल तर ते पान मुख्य नामविश्वाचाच भाग मानले जाते.