विनोद खन्ना
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
विनोद खन्ना (पंजाबी: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; रोमन लिपी: Vinod Khanna) (६ ऑक्टोबर इ.स. १९४६ - २७ एप्रिल इ.स. २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, अचानक (इ.स. १९७३), परवरिश (इ.स. १९७७), अमर अकबर अॅन्थनी (इ.स. १९७७), मुकद्दर का सिकंदर (इ.स. १९७८), द बर्निंग ट्रेन (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
जलद तथ्य विनोद खन्ना, जन्म ...
विनोद खन्ना | |
---|---|
जन्म |
६ ऑक्टोबर, इ.स. १९४६ पेशावर, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
२७ एप्रिल इ.स. २०१७[1] मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, राजकारण |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९६८ - इ.स. २०१७ |
भाषा | हिंदी; पंजाबी |
प्रमुख चित्रपट | लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे |
पत्नी |
गीतांजली (इ.स. १९७१ - ८५ घटस्फोट) कविता (इ.स. १९९० - २०१७) |
अपत्ये |
२ मुले - राहुल खन्ना, अक्षय खन्ना २ मुली - साक्षी खन्ना, श्रद्धा खन्ना |
बंद करा