विलयछिद्र
From Wikipedia, the free encyclopedia
भूपृष्ठाचा काही भाग जेव्हा काही कारणांमुळे भंग पावतो किंवा कोसळतो, तेव्हा जे छिद्र तयार होते त्याला विलयछिद्र किंवा भूछिद्र म्हणतात. अनेक विलयछिद्रे ही चुनखडीचे पाण्यामध्ये विरघळणे यासारख्या कार्स्ट (विद्रावण) प्रक्रियेमुळे घडतात.[1] काही विलयछिद्रे भूपृष्ठाखालील खडकाळ भाग भूजलाबरोबर वाहून गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या पोकळीमुळे तयार होतात.[2] विलयछिद्रांचा व्यास तसेच खोली १ ते ६०० मी. पर्यंत असू शकते. त्यांचा अंतरभाग मृदेचा किंवा खडकाचा किंवा इतरही पदार्थांचा असू शकतो. विलयछिद्रे अचानक किंवा संथपणे तयार होऊ शकतात, आणि जगात सर्वत्र आढळून येतात.[3] जुलै २०१५ मध्ये शास्त्रज्ञांनी ६७पी/चुरिमोव्ह-गेरासिमेंको या धूमकेतूवरही विलयछिद्रे असल्याचे जाहीर केले.[4][5]