व्लादिमिर नाबोकोव्ह
From Wikipedia, the free encyclopedia
व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह (रशियन: Влади́мир Влади́мирович Набо́ков, २२ एप्रिल, १८८९ - २ जुलै, १९७७) (साचा:IPA-ru) हा एक रशियन-अमेरिकन कादंबरीकार होता. [1] आपल्या पहिल्या ९ कादंबऱ्या रशियन भाषेत लिहिल्यानंतर त्याने इंग्रजीमध्ये लिखाणास सुरुवात केली. १९५५ साली प्रकाशित झालेली लोलिता कादंबरी ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे.’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये लोलिता ही चौथ्या क्रमांकावर, पेल फायर ५३व्या आणि नाबोकोव्हची आत्मकथा स्पीक, मेमरी ही आठव्या क्रमांकावर आहे. [2] लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये, वर्णनाचे बारकावे आणि शैलीदारपणा ही नाबोकोव्हच्या कामाची सर्वोत्तम खासियत होती.
जलद तथ्य व्लादिमिर नाबोकोव्ह, जन्म नाव ...
व्लादिमिर नाबोकोव्ह | |
---|---|
जन्म नाव | व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह |
जन्म |
२२ एप्रिल १८८९ (1889-04-22) ग्रेगोरियन कालमापन पद्धतीप्रमाणे [1], १० एप्रिल १८८९ (1889-04-10) ज्युलिअन कालमापन पद्धतीप्रमाणे सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य [1] |
मृत्यू |
२ जुलै, १९७७ (वय ८८) [1] माँत्रू, स्वित्झर्लंड [1] |
कार्यक्षेत्र | कादंबरीकार, प्राध्यापक, फुलपाखरांचा अभ्यासक |
भाषा | रशियन, इंग्रजी |
साहित्य प्रकार | कादंबरी, कविता, नाटक |
चळवळ | आधुनिकतावाद, उत्तराधुनिकतावाद |
प्रसिद्ध साहित्यकृती |
द डिफेन्स (१९३०), द रियल लाइफ ऑफ सेबॅस्टिअन नाइट (१९४१), लोलिता (१९५५), पेल फायर (१९६२), स्पीक, मेमरी |
प्रभावित | मार्टिन अमिस, मायकेल शेबॉन, झुम्पा लाहिरी, डॉन दे'लिल्लो |
पत्नी | वेरा नाबोकोव्हा |
अपत्ये | द्मित्री नाबोकोव्ह |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ | http://vladimir-nabokov.org |
बंद करा
कादंबऱ्या लिहिण्याबरोबरच नाबोकोव्हला फुलपाखरांचा अभ्यास करण्याची आणि बुद्धिबळाचे डावपेच लिहिण्याची देखील आवड होती.