संभाजी महाराजांचे साहित्य
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत.श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी छ.येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत,फारसी,उर्दु,अरबी,ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते.इंग्रजीतुन त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला.अतिशय हुशार,कर्तबगार,दुरदरषी,अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
Remove ads
बुधभूषण
या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितात यावरूनच ते सुसंस्कृत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते.
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे आणि आजोबा शहाजी राजे यांची स्तुती यांचा उल्लेख आहे:
शिवाजीराजे स्तुती -
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥ अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
शहाजी राजे स्तुती-
भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: || अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.
श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक (संभाजी राजे स्तुती) -
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:| यःकाव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी || अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.)
क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक-
येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति | प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा|| यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: | पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: || अर्थ: ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads