१९३४ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य 1er Campeonato Mundial de Futbol, स्पर्धा माहिती ...
1er Campeonato Mundial de Futbol | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | इटली |
तारखा | २७ मे – १० जून |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ८ (८ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | इटली (१ वेळा) |
उपविजेता | चेकोस्लोव्हाकिया |
तिसरे स्थान | जर्मनी |
चौथे स्थान | ऑस्ट्रिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | १७ |
एकूण गोल | ७० (४.१२ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ३,५८,००० (२१,०५९ प्रति सामना) |
← १९३० १९३८ → | |
बंद करा
यजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.