२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये ९ ते ३१ जानेवारी इ.स. २०१५ दरम्यान खेळवली गेली. ए.एफ.सी.द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला.
जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | ऑस्ट्रेलिया |
तारखा | ९—३१ जानेवारी |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ५ (५ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ऑस्ट्रेलिया (१ वेळा) |
उपविजेता | दक्षिण कोरिया |
तिसरे स्थान | संयुक्त अरब अमिराती |
चौथे स्थान | इराक |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३२ |
एकूण गोल | ८५ (२.६६ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ६,४९,७०५ (२०,३०३ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल |
अली माबखौत (5 gola) |
सर्वोत्तम खेळाडू | मासिमो लुओंगो |
← २०११ २०१९ → | |
बंद करा
३१ जानेवारी रोजी सिडनीच्या स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियाचा अतिरिक्त वेळेत २-१ असा पराभव करून हा चषक पहिल्यांदाच जिंकला. ह्या अजिंक्यपदासोबत ऑस्ट्रेलियाला रशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमध्ये आपोआप पात्रता मिळाली. गतविजेत्या जपानला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्कारावा लागला.