७, लोक कल्याण मार्ग (पूर्वीचे नाव ७, रेसकोर्स रोड) हे भारतीय पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे.[1][2] लोक कल्याण मार्गावर, नवी दिल्ली येथे स्थित, पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे अधिकृत नाव "पंचवटी" आहे. हे १९८० च्या दशकात बांधले गेले. हे लुटियन्स दिल्लीतील पाच बंगल्यांचा समावेश असलेल्या १२ एकर जागेवर पसरलेले आहे. यात पंतप्रधानांचे कार्यालय, निवास क्षेत्र, विशेष संरक्षण गटासाठी सुरक्षा भवन आणि अतिथीगृह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे ७, लोक कल्याण मार्ग म्हणले जाते. यात पंतप्रधानांचे मुख्य कार्यालय नाही परंतु त्यामध्ये अनौपचारिक भेटीसाठी विचारविनिमय कक्ष आहे. संपूर्ण लोक कल्याण मार्ग हा जनतेसाठी बंद आहे. १९८४ मध्ये येथे राहणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान होते.

Thumb यात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नाही, जे सचिवालय इमारतीच्या दक्षिण ब्लॉकमध्ये, नवी दिल्ली जवळील रायसीना हिल वर आहे, जेथे कॅबिनेट सचिवालय कार्यरत आहे. सर्वात जवळचे दिल्ली मेट्रो स्टेशन लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन आहे.[3] जेव्हा नवीन पंतप्रधान नेमले जातात तेव्हा त्यांच्या मूळ घराला सुरक्षा दिली जाते आणि नवीन घरात लवकरात लवकर जाण्याचा सल्ला दिला जातो. सप्टेंबर २०१६ मध्ये "रेसकोर्स रोड"चे नाव बदलून "लोक कल्याण मार्ग" अस्तित्वात आला.[4]

इतिहास

तत्पूर्वी, भारताचे पंतप्रधान संसदेने त्यांना दिलेल्या किंवा स्वतःच्या घरात राहत असत. जवाहरलाल नेहरू यांनी तीन मुर्ती भवन मध्ये निवास घेतले, जे ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे कमांडर-इन चीफ यांचे निवासस्थान होते. १९६४ मध्ये नेहरूंच्या मृत्यूनंतर या इमारतीचे रूपांतर नेहरू मेमोरियल संग्रहालय आणि ग्रंथालय मध्ये करण्यात आले. भारताचे पुढचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १०, जनपथला त्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून निवडले, तिथे ते १९६४-१९६६ राहिले. ते आता सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या हत्यानंतर इंदिरा गांधी यांचे निवासस्थान १, सफदरजंग रोडचे देखील संग्रहालयात रूपांतर झाले.

१९८४ मध्ये "७, रेसकोर्स रोड" येथे राहणारे राजीव गांधी पहिले पंतप्रधान होते. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यावर, नागरी व्यवहार मंत्रालयाने ७, रेसकोर्स रोड परिसराला पंतप्रधानांचे स्थायी निवासस्थान-सह-कार्यालय म्हणून नियुक्त केले. ३० मे १९९० रोजीच्या शासकीय अधिसूचनेत या बंगल्यांना अधिकृतपणे पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून नेमण्यात आले. मनमोहन सिंग यांनी रिकामे केल्यानंतर अधिकृत निवासस्थानाचे नूतनीकरण सुरू असल्याने नरेंद्र मोदी हे ५, रेसकॉर्स रोड येथे काही काळासाठी राहत होते.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.