अकोले तालुका

अकोले तालुका From Wikipedia, the free encyclopedia

अकोले तालुका
Remove ads

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.

हा लेख अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जलद तथ्य अकोले तालुकाअकोलेअकोले तालुक्याचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान, राज्य ...
Remove ads

प्रमुख आकर्षणे

रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड (पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.

अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते.[ संदर्भ हवा ] या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

Remove ads

धरणे

प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.

रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे.

४) बलठण धरण :

अकोले तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील बलठण धरण हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन नव्याने ओळखले जाणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. बलठण व पुरुषवाडी यां गावांच्या स्थिरावरील कुरकुंडी नदी आता बलठण धरण नावाने ओळखली जाते, माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकीर्दित बांधण्यात आलेले हे बलठण धरण असुन येथील देखावा पाहण्यासाठी पावसाळ्यात गिर्यारोहकांची भ्रमंती बघायला मिळते.

Remove ads

अकोले तालुक्यातील गावे

[][]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "अहमदनगर जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरील अकोले तालुक्याविषयीची संक्षिप्त माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads