अमेरिकन डॉलर

अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्राचे अधुकृत चलन From Wikipedia, the free encyclopedia

अमेरिकन डॉलर
Remove ads

अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.

जलद तथ्य United States dollarUS$, ISO 4217 ...

१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज [] इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते [].

अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.

Remove ads

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads