अस्पृश्यता

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजेच अस्पृश्यता होय. जातीय अस्पृश्यता हा प्रकार भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जातीय अस्पृश्यतेच्या नियमांनुसार कनिष्ठ जातीतील लोक हे उच्च जातीतील लोकांना स्पर्श करू शकत नाहीत. पेशवाईच्या काळात भारतात अस्पृश्यतेला अमानवी स्वरूप आले होते. अस्पृश्यतेचा उगम मनुस्मृती या ग्रंथातून झाल्याचे मानले जाते.

जातिअंताबाबत आपल्याकडे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आर्थिक स्तर बदलला, की आपोआप हे बदलेल, असे डावी मंडळीही म्हणतात. पण, जातिव्यवस्था किती अवैज्ञानिक आहे, हे शिक्षणातून शिकविले जात नाही.[]

एका सर्वेक्षणानुसार, शहरातले २० टक्के लोक आणि खेड्यातले ३० टक्के लोक अस्पृश्यता पाळतात. या सर्वेक्षणात या लोकांनीच स्वतः ही बाब स्पष्टपणे सांगितली आहे. अस्पृश्यता पाळणाऱ्यांमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हा भेदभाव शहरातले ६२ टक्के ब्राह्मण आणि खेड्यातले ३९ टक्के ब्राह्मण अजूनही पाळतात. याबाबत अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि ब्राह्मणेतर उच्चवर्णीय यांचा क्रमांक लागतो.[]

Remove ads

उगम

प्राचीन काळातील स्वरूप

मध्ययुगीन काळातील स्वरूप

पेशवाईतील स्वरूप

अस्पृश्यां विरुद्ध हिंसक घटना

२ जून १९३६ साली बाबा साहेब आंबेडकरांनी दलितांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अन्याय आणि हिंसेचे पुढील शब्दात वर्णन केले होते. : ' सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे , विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे , वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे , स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे , दागदागिने घातल्यामुळे , पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे , जमीन खरेदी केल्यामुळे , जानवे घातल्यामुळे , मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे , पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे , भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे , शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे , पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे , अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार , जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते ? याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे , या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत , त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते ; ती ही की , तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता , म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे , उंची पोषाख घातल्यामुळे , जानवी घातल्यामुळे , तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे , घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो , उंची पोषाख करतो , तांब्याची भांडी वापरतो , घोड्यावरून वरात नेतो , तो वरच्या वर्गापैकी कुणाचेही नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा ? या रोषाचे कारण एकच आहे ; ते हेच की , अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात , अपवित्र आहात , खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते , ही गोष्ट निविर्वाद आहे. ' []

१२ नव्हेंबर, २०१२ अस्पृश्यता निवारणात प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या तामिळनाडू सारख्या राज्यात धर्मापुरी येथे एका सवर्ण मुलीने दलित मुलाशी विवाह केला एवढ्या कारणा करिता मुलीच्या वडीलांनी आत्महत्या केली आणि सवर्ण मुलीच्या वडीलांच्या आत्महत्येचा बदला म्हणून सवर्णांनी तीन दलित वस्त्यातील २६८ झोपड्या जाळल्या. ४० घरांचे पूर्ण आणि १७५ घरांचे अंशतः नुकसान कले गेले ज्याची अंदाजीत किंमत ७ कोतींच्या आसपास असावी. कोडामपट्टी येथील आंतरजातीय विवाह झालेल्या कुंटूंबावर जमावाने हल्ला केला.National Commission for Scheduled Castes चे अध्यक्ष पी एल पुनीया यांच्या म्हणण्यानुसार हल्ला पुर्वनियोजीत पणे केला गेला असावा.[]

Remove ads

अस्पृश्यता निवारणाचा लढा

जयपूरच्या उच्च न्यायालयात मनूचा पुतळा हटविण्यासाठी दोन वेळा सत्याग्रह केला. आता, उलट स्थिती पाहायला मिळते. कारण, मनूचा पुतळा उभारण्याच्या वेळी 17 न्यायाधीश उपस्थित होते. नंतर त्यांच्या लक्षात आले, की आपण मोठी चूक करून बसलो आहोत.[]

उत्तर भारतातील अस्पृश्यता

बाबा आढावांनी इंदूरहून जयपूरपर्यंत पायी जाताना जी खेडी पाहिली, त्या सर्व ठिकाणी वेगळ्या वाड्या आहेत. अस्पृश्‍यता पाळली जाते. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह होऊ लागल्यावर जात पंचायती जास्त सजग होत गेल्या. खाप पंचायती सुरू झाल्या.[] आता आंतरजातीय विवाह वाढत आहेत. मुलींना अनुरूपता जातीतच मिळेल, अशी स्थिती नाही. त्यातून हे घडत आहे. पण, त्याचबरोबर जातीबाहेर गेल्यावर मारून टाकण्यापर्यंत मजल जात आहे. देशात अशा अनेक घटना होत आहेत. खाप पंचायत, ऑनर किलिंग हे त्यातील प्रकार..[]

Remove ads

अस्पृश्यता विरोधी कायदा

भारतीय घटनेतील मूलभूत हक्कापैकी कलम 14 ते 18 या कलमात समानतेचा हक्क आहे

 त्यानुसार कलम 17 हा अस्पृश्यता नष्ट करण्यासंदर्भात आहे (१९५५ साली).

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads