आनंद तेलतुंबडे
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आनंद तेलतुंबडे हे एक मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि दलित-आंबेडकरवादी चळवळीतील विचारवंत आहेत.[१]

शिक्षण व कारकीर्द
तेलतुंबडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी खरगपूरलाही अध्यापन केले असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते जाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (टीपीडीआर)चे ते सरचिटणीस आहेत. तसेच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.[२]
Remove ads
लेखन
तेलतुंबडे यांनी २६ पुस्तके लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन सुद्धा केले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.[३]
वैयक्तिक जीवन
तेलतुंबडे यांचा विवाह रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात व यशवंत आंबेडकर यांच्या मुलगी आहेत. प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर हे तेलतुंबडेंचे मेहुणे आहेत. प्राची व रश्मी या रमाबाई व आनंद तेलतुंबडे यांच्या मुली आहेत.
ते नक्षली नेता तथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचे मोठे भाऊ आहेत.[४] [५] मिलिंद तेलतुंबडे हे २०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचाराचा मुख्य फायनान्सर होते. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात महाराष्ट्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांमध्ये तेलतुंबडे यांचा समावेश होता.[६] ते एकूण ६३ गुन्ह्यांमधील फरारी आरोपी होते[७]
नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप
पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दलित-बौद्धांविरूद्ध हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक करून कारवाई केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.[८][९]
पुरस्कार व सन्मान
जानेवारी २०२४ मध्ये, तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारने बसव पुरस्काराने सन्मानित केले.[१०][११][१२]
हे सुद्धा पहा
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads