आल्ब्रेख्त ड्यूरर
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आल्ब्रेख्त ड्यूरर (२१ मे, इ.स. १४७१ - ६ एप्रिल, इ.स. १५२८) हा एक जर्मन चित्रकार होता. रेखाटन, चित्रकला, एनग्रेव्हिंग वुडकट या तंत्राने छपाई अशा विविध कलामाध्यमात मोलाचे योगदान करणारा जर्मन कलाकार म्हणून तो ओळखला जातो.
Remove ads
शिक्षण
ड्यूररचा जन्म जर्मनीतील न्यूरेंबर्ग शहरात झाला. त्याचे वडील व्यवसायाने सोनार होते त्यामुळे पत्र्यावर नाजूक कोरीवकाम करण्याची कला तो लहानपणीच शिकला. वोल्गेमट या चित्रकाराच्या स्टुडिओत त्याने तीन वर्षे काम केले. तिथे तो एनग्रेव्हिंग आणि काष्ठमुद्रातंत्र शिकला. इटलीत जाऊन व्हेनिसमध्ये त्याने न्यूडपेंटिंग आणि पर्स्पेक्टिव्ह बाबतच्या तंत्राचाही अभ्यास केला. इटलीत असताना त्याने गुलामस्त्रिया, पागोटेवाले तुर्क य़ांची रेखाटने केली होती.
Remove ads
चित्रकृती
इटलीतून परतल्यावर आल्ब्रेख्त ड्यूररने न्यूरेंबर्ग येथे स्वतःचा स्टुडिओ उभारला. नंतरच्या काही वर्षात त्याने बायबलमधील प्रसंग, रूपककथा यांची चित्रे रेखाटली. त्याच्या प्रसिद्ध चित्रांमध्ये 'सेल्फ पोर्ट्रेट' (इ.स. १४९८), 'पोर्ट्रेट ऑफ एलिझाबेथ ट्युचर' (इ.स. १४९९), 'अ हेअर' (इ.स. १५०८), 'द लार्ज पीस ऑफ टर्फ' (इ.स. १५०३), 'ॲडम' (इ.स. १५०७), 'द ॲडोरेशन ऑफ द मॅगी' (इ.स. १५०४), 'द ॲडोरेशन ऑफ द ट्रिनिटी' (इ.स. १५११), 'द फोर ॲपस्टल्स' (इ.स. १५२६) यांचा समावेश आहे.
काष्ठमुद्रातंत्र वापरून ड्यूररने सिंहाच्या पायातील काटा काढणाऱ्या सेंट जोरामच्या जीवनातील प्रसंगही चित्रित केलेला आहे.
एनग्रेव्हिंग माध्यमाच्या ड्यूररच्या गाजलेल्या चित्रकृतीत 'द नाईट, डेथ अँड द डेव्हील'[१] (इ.स. १५१३), 'द फॉल ऑफ मॅन' (इ.स. १५०४), 'मेलेंकोलिआ' (इ.स. १५०४) या चित्रकृतींचा समावेश होतो.
Remove ads
चित्रदालन
- सेंट जोराम इन हिज स्टडी
- द नाईट, डेथ अँड द डेव्हील
- मेलेंकोलिआ
- द ॲडोरेशन ऑफ द मॅगी
- द फोर ॲपस्टल्स
लेखन
आल्ब्रेख्त ड्यूररने चित्रकला आणि काष्ठमुद्रातंत्र यासंबंधित माहितीपूर्ण व महत्त्वाचे असे 'आर्ट ऑफ मेजरमेंट विथ कंपास अँड रूलर', 'टिचिंग अबाऊट द फोर्टिफिकेशन ऑफ टाउन्स, कॅसल्स अँड प्लेसेस' व 'ट्रिटाईज ऑन ह्युमन प्रपोर्शन्स' हे तीन ग्रंथ लिहिले.
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads