एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर

2019 ची हिंदी मालिका From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टीव्ही दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे.[] ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे.[][] ७ नोव्हेंबर २०१९ रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरांची सुरू करण्याची घोषणा अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्ही वर प्रदर्शित होत आहे.[][]

जलद तथ्य एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर, उपशीर्षक ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जवादे हे मुख्य भूमिका साकारतील.[][] ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, २२ मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.[] बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही तिसरी मालिका आहे; यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथाडॉ. आंबेडकर ह्या मालिका बनवण्यात आल्या आहेत.

Remove ads

कलाकार

अनुवादित

अधिक माहिती भाषा, नाव ...

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads