ऑलिंपिक खेळात भारत

From Wikipedia, the free encyclopedia

ऑलिंपिक खेळात भारत
Remove ads

भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला .

जलद तथ्य ऑलिंपिक खेळात भारत, आय.ओ.सी. संकेत ...
Remove ads

इतिहास

१९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सुवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.

भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक भारतासाठी सर्वांत जास्त यशस्वी ठरले. यावेळी भारताला ६ पदके मिळाली (२५ मी रॅपिड फायर नेमबाजी मध्ये विजय कुमारला रौप्य पदक, ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये सुशिल कुमारला रौप्य पदक, प्रत्येकी एक कांस्य पदक १० मीटर एर रायफल नेमबाजी मध्ये गगन नारंग, महिला एकेरी बॅटमिंटन मध्ये सायना नेहवाल, ५१ किलो बॉक्सिंग मध्ये मेरी कोम आणि ६० किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त यांना मिळाले)

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल. एकूण पदकांच्या संख्येनुसार विचार केल्यास हे ऑलिंपिक भारतासाठी सर्वात जास्त यशस्वी ठरले.

सुशील कुमार हा नॉर्मन प्रितचार्ड(ज्याने ब्रिटिश राजवटीतील भारताकडून खेळताना दोन पदके जिंकली होती) नंतर एकच क्रिडाप्रकारात २ ऑलिंपिक पदके मिळविणारा पहिला भारतीय ठरला.

Remove ads

पदक विजेते

अधिक माहिती पदक, नाव ...
Remove ads

पदकतालिका

उन्हाळी ऑलिंपिक प्रमाणे पदक

अधिक माहिती Games, एकूण ...

खेळाप्रमाणे पदक

अधिक माहिती Sport, एकूण ...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads