कुणाल

मौर्य सम्राट अशोक यांचा पुत्र From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

कुणाल मौर्य (जन्म : इ.स.पू. २६३ - ?) हा सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती चा मुलगा होता. हा सम्राट अशोकांचा वारस आणि संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या मौर्य साम्राज्याचा भावी राजा मानला गेला होता. भविष्यात कुणाल राजा होणार यामुळे त्याच्याबद्दल आत्यंतिक मत्सर करणाऱ्या तिष्यरक्षिता नावाच्या सम्राट अशोकांच्या दुसऱ्या राणीने कुणाल तरुण असतानाच त्याचे डोळे काढून त्याला आंधळे केले होते. त्यामुळे कुणाल सिंहासनावर बसू शकला नाही.

जलद तथ्य युवराज कुणाल ...
Remove ads

कुणाल नावाचा अर्थ

कुणाल हे हिमालयातल्या एका लांब चोच असणाऱ्या पक्षाचे नाव आहे. या पक्षाला इंग्रजीत ‘पेंटेड स्नाईप्स’ असे म्हणले जाते. साऱ्या भारतवर्षावर राज्य करणाऱ्या सम्राट अशोकांना या पक्षाच्या डोळ्यांवरून आपल्या मुलाचे नाव कुणाल ठेवले होते. कुणाल या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘सुंदर डोळ्यांचा पक्षी’ असा होतो तर माणसाचे नाव कुणाल असेल तर त्याला अर्थ होतो ‘असा माणूस ज्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते’ किंवा ‘असा माणूस ज्याला काहीही पाहण्यासाठी सुंदर डोळे लाभलेले आहेत.’ संस्कृत भाषेनुसार या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असाही होऊ शकतो.

Remove ads

सुरुवातीचा काळ

सम्राट अशोकांनी आपल्या या मुलाला लहानपणीच उज्जैनला पाठवले होते.तेथेच त्याने लहानाचे मोठे व्हावे, राजपुत्र म्हणून तेथेच शिक्षण घ्यावे आणि मौर्य साम्राज्याचा वारस म्हणूनच त्याची जडणघडण व्हावी हा अशोकांचा हेतू होता.

अंधत्व

सिंहासनावर हक्क सांगण्याचे प्रयत्न

हे ही पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads