खेड तालुका (पुणे)
महाराष्ट्रातील तहसील, भारत From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......
Remove ads
पर्यटन स्थळे
भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत.
शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे.
भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत.
Remove ads
तालुक्यातील गावे
- आडगाव (खेड)
- आढे
- अहिरे (खेड)
- आखारवाडी
- आखतुळी
- आळंदी ग्रामीण
- आंबेठाण
- आंभु
- आंबोळी (खेड)
- अनावळे
- अरूदेवाडी
- असखेड बुद्रुक
- असखेड खुर्द
- आवदर
- आवंढे (खेड)
- आव्हाट
- बहिरवाडी (खेड)
- बहुळ
- भालावडी (खेड)
- भांबोळी
- भिवेगाव
- भोमाळे
- भोरगिरी (खेड)
- भोसे (खेड)
- बीबी
- बिरडवाडी
- बुरसेवाडी
- बुतेवाडी
- चाकण
- चांदोळी
- चांदुस
- चारहोळीखुर्द
- चास (खेड)
- चौधरवाडी (खेड)
- चिचबाईवाडी
- चिखलगाव (खेड)
- चिंबळी
- चिंचोशी
- दरकवाडी
- दावडी (खेड)
- देहाणे (खेड)
- देशमुखवाडी (खेड)
- देवोशी
- दोंदे
- धामणे (खेड)
- धामणगाव बुद्रुक (खेड)
- धामणगाव खुर्द (खेड)
- धानोरे (खेड)
- ढोरेवाडी
- धुवोळी
- एकलहरे (खेड)
- गडद
- गडकवाडी
- गारगोटवाडी
- घोटवाडी
- गोळेगाव (खेड)
- गोणावडी
- गोरेगाव (खेड)
- गोसासी
- गुळाणी
- गुंडळवाडी
- हेदरूज
- होळेवाडी (खेड)
- जैदवाडी
- जाऊळकेबुद्रुक
- जाऊळकेखुर्द
- कडाचीवाडी
- कडधे (खेड)
- कडुस
- काहू
- काळेचीवाडी
- काळमोडी
- काळुस
- कामण
- कान्हेरसर
- कान्हेवाडीबुद्रुक
- कान्हेवाडीखुर्द
- कान्हेवाडी तर्फे चाकण
- करंजाविहिरे
- कारकुडी
- कासारी (खेड)
- केळगाव
- खालची भांबुरवाडी
- खाळुंब्रे
- खराबवाडी
- खारावळी
- खारोशी (खेड)
- खरपूड
- खरपुडीबुद्रुक
- खरपुडीखुर्द
- किवळे
- कोहिंदे बुद्रुक
- कोहिंदे खुर्द
- कोहिणकरवाडी
- कोरेगाव बुद्रुक
- कोरेगाव खुर्द (खेड)
- कोयळी
- कोयळी तर्फे चाकण
- कोयळी तर्फे वाडा
- कोये
- कुडे बुद्रुक
- कुडे खुर्द
- कुरकुंडी
- कुरूळी
- महाळुंगे (खेड)
- माजगाव (खेड)
- मांडोशी
- मांजरेवाडी (खेड)
- मरकळ
- मेदनकरवाडी
- मिरजेवाडी
- मोहकळ
- मोई
- मोरोशी (खेड)
- नायफड
- नाणेकरवाडी
- निघोजे
- निमगाव (खेड)
- पाभे
- पाचर्णेवाडी
- पडाळी (खेड)
- पाईत
- पालु
- पांगारी (खेड)
- पापळवाडी
- पराळे
- परसुळ
- पिंपळगाव तर्फे चाकण
- पिंपळगाव तर्फे खेड
- पिंपरीबुद्रुक (खेड)
- पिंपरीखुर्द (खेड)
- पुर (खेड)
- राजगुरुनगर
- राक्षेवाडी (खेड)
- रासे
- रौंधळवाडी
- रोहकळ
- रेटवडी
- साबळेवाडी (खेड)
- साबुर्डी
- साकुर्डी (खेड)
- सांडभोरवाडी
- सांगुर्डी
- संतोषनगर
- सत्कारस्थळ
- सावरदरी
- सायागाव
- शेळगाव (खेड)
- शेळु (खेड)
- शेंदुर्ली
- शिंदे (खेड)
- शिरगाव (खेड,पुणे)
- शिरोळी (खेड)
- शिवे
- सिद्धेगव्हाण
- सोळु
- सुपे (खेड)
- सुरकुंडी
- टाकळकरवाडी
- तळवडे (खेड)
- टेकावडी
- टिफणवाडी
- टोकावडे (खेड)
- तोरणे बुद्रुक
- तोरणे खुर्द
- वडगाव घेणांद
- वडगाव तर्फे खेड
- वालड
- वांजुळविहिरे
- वराळे
- वरची भांबुरवाडी
- वारूडे
- वेल्हवळे
- वेताळे
- विरहाम
- वाडा
- वाफेगाव (खेड)
- वाघु
- वाहागाव
- वाजावणे
- वाकळवाडी (खेड)
- वाकी बुद्रुक (खेड)
- वाकी खुर्द (खेड)
- वाकी तर्फे वाडा
- वांदरे (खेड)
- वांजळे (खेड)
- वाशेरे (खेड)
- वासुळी
- येलवाडी
- येणीये बुद्रुक
- येणीये खुर्द
Remove ads
पार्श्वभूमी
खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे.
खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत.
खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी )
मो. ९९२२४५७४७५
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads