जिवा महाला

श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads


जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते, त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. त्यांचे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई.

Remove ads

गाव

जिवाजींचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवाजी महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.

घराण

वंशावळ – जिवाजी महाले हे नाभिक समाजाचे होते असे सांगितले जाते. जिवाजी महाले यांचे मोठे भाऊ हा तानाजी (तानाजी) महाले संकपाळ. जिवाजी महालेंचे पुत्र सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय.

हरी आणि सुभानजी हे जिवाजी महालाचे खापरपणतू होतात.

जिवाजी महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवाजी महाले यांना पहिलवानीचे धडे दिले होते. जिवाजींचे वडील शिवाजी राजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते. युद्धसमयी त्यांना एक पाय गमवावा लागला होता.

Remove ads

पराक्रम

शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाजींने सय्यद बंडाचा हात कापून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय २५ च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे.

दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता. आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवतात. जिवाजी महाले सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते. सैयद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवाजी महाले यांनी त्याला पालथा पाडला होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा" नव्हे तर ही म्हण अशी होती "होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.

छत्रपतींकडून बक्षीस

छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवांच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवाजी महाले यांचा मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

पुस्तके

  • जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान विचार प्रकाशन--कोल्हापूर)
  • जिवा महाला (लेख्क - प्रभाकर भावे)
  • जिवा महाला (कादंबरी, लेखक - प्रा. डाॅ.सुरेश गायकवाड)
  • शिवरक्षक जीवाजी महाला (लेखक - हरीश ससनकर)
  • शिवरायांचे शिलेदार : जिवा महाला (प्रभाकर भावे)

रस्ता

मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील ना.सी. फडके रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणाऱ्या एका छोट्या रस्त्याला जिवा महाले रोड म्हणतात.

चौक

शिवरत्न जिवाजी महाले चौक (अहमदनगर) शूरवीर जिवाजी महाले चौक,अपोलो टाॅकीज(पुणे)

पुरस्कार

शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवा महाले याच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:-

  • अपर्णा रामतीर्थकर (सोलापूर),
  • अमरनाथ आंदोलनाचे नेते ॲड. लीलाकिरण शर्मा
  • उद्धव ठाकरे
  • शरद पोंक्षे
  • गोरक्षक सतीशकुमार प्रधान
  • शहीद कर्नल संतोष महाडीक
  • कर्नल संभाजीराव पाटील (कऱ्हाड)
  • सुभाष कोळी (सांगली),

वगैरे.

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads