जैन धर्म

एक प्राचिन धर्म From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो.

जलद तथ्य जैन धर्म, प्रार्थना आणि प्रतिज्ञा ...

अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला आले असे मानले जाते. जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थंकर यांची परंपरा सांगितली जाते . कथेनुसार ऋषभनाथ ( ऋषभदेव, आदिनाथ) हे पहिले तीर्थंकर होते तर तेविसावे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ क्षत्रियाप्रमाणेच पार्श्वनाथांचे आरंभीचे जीवन हे सुखकारक होते मात्र पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य वेचले पार्श्वनाथांचा हा काळ सामान्यपणे इसवीसनपूर्व 9 वे शतक मानला जातो.[ संदर्भ हवा ]

Remove ads

जैन धर्माचे तत्त्वज्ञान

  • जीव -जैन धर्मानुसार जीव हा चैतन्यमय आहे. जीव अविनाशी आहे. जीव हा देव, मनुष्य, पक्षी, पशू इ. विविध रूपात जन्म घेतो.
  • अजीव - अजीवाचे धर्म, अधर्म, आकाश, पुदगल, काल, हे पाच प्रकार आहेत. अजीव हे चैतन्यविरहित आहेत. जीव व पाच प्रकारचे अजीव मिळून सहा द्रव्ये तयार होतात. जैनांच्या मते कोणत्याही द्रव्याची तीन अंगे असतात. जैन दर्शनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही दर्शनात धर्म व अधर्म हे अजीव पदार्थ मानलेले नाहीत.
  • पाप, पुण्य- पुण्य म्हणजे,जीवाशी संबंध असलेला व जीवाला स्वर्ग, ऐश्वर्य, इ.चांगले फळ मिळवून देणारा कर्म-समुदाय. पाप म्हणजे पुण्याच्या विपरीत असा कर्मसमुदाय. त्याची ८२ कारणे आहेत. त्यांनाच 'आस्रव' असे नाव आहे.
  • ज्ञान-जैन तत्त्वानुसार ज्ञान दोन प्रकारचे असते. परोक्ष व अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान आत्मा कर्मबंधनातून मुक्त झाल्यावर प्राप्त होते. परोक्ष ज्ञान म्हणजे मन किंवा इंद्रियाद्वारा वस्तूंचे प्राप्त होणारे ज्ञान.
  • 'अहिंसा परमो धर्मः' हा मुख्य नियम या धर्मात मानला जातो.
  • स्यादवाद - एखाद्या वस्तूसंबंधी किंवा विषयासंबंधी विचार करतांना ७ वेगवेगळ्या प्रकारे तो विचार मांडता येतो. हा सिद्धान्त सप्तभंगी सिद्धान्त म्हणून ओळखला जातो.
  1. स्यादस्ति - शक्य आहे, की ते आहे,
  2. स्यान्नास्ति - शक्य आहे, की ते नाही,
  3. स्यादस्तिच नास्तिच - शक्य आहे, की ते आहे, आणि ते नाही,
  4. स्यादव्यक्तव्यम् - शक्य आहे, की ते अव्यक्त आहे,
  5. स्यादस्तिच अव्यक्तव्यंच - शक्य आहे, की ते आहे, आणि अव्यक्त आहे,
  6. स्यान्नास्तिच अव्यक्तव्यंच - शक्य आहे, की ते नाही, आणि अव्यक्त आहे,
  7. स्यादस्तिच नास्ति चाव्यक्तंच - शक्य आहे, की ते आहे, नाही, आणि अव्यक्त आहे.[ संदर्भ हवा ]
  8. धर्म आणि संस्कृती ही उत्क्रांत मानवी जीवनाची प्रधान अंगे आहेत्.

पंचमहाव्रते

  • सत्यं - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
  • अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, वचन अथवा कायेद्वारे हत्या करू नये.
  • अस्तेयं - अस्तेय म्हणजे चोरी करू नये.
  • अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा.
  • ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.

तीन गुणव्रते

  • दिग्व्रत -
  • कालाव्रत -
  • अनर्थदंडव्रत

चार शिक्षाव्रते

  • सामायिक
  • प्रोषधोपवास
  • भोगोपभोग परिणाम
  • अतिथी संविभाग

जैन धर्मातील पंथ

  • दिगंबर पंथ -
  • श्वेतांबर पंथ -
    • स्थानकवासी (उपपंथ)
Remove ads

तीर्थंकर

मुख्य लेख: चोवीस तीर्थंकर

जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले त्यांची नावे -

  1. श्री वृषभनाथ भगवान - वृषभदेव भगवान या युगातील प्रथम तीर्थंकर आहे. वृषभदेव यांना आदिनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. आदिनाथांचा जन्म अयोध्येत झाला. व त्यांनी अयोध्येवर राज्य केलं. त्यांचे पिता नाभी हे होते तर आईचे नाव मरुदेवी हे होते. वृषभनाथ हे इक्ष्वाकूवंशातील होते. त्यांच्या पुत्रापैकी चक्रवर्ती सम्राट भरत व भगवान बाहुबली हे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या राज्यातील जनतेला जीवन कौशल्य, नैतिक मूल्ये, संस्कार शिकवले काही काळ राज्य केल्यानंतर त्यांनी त्यांच राज्य मुलात वाटुन दिल्यानंतर आदिनाथांनी दिक्षा घेतली. व तपश्चर्या करू लागले काही काळानंतर केवल ज्ञान प्राप्त झाले व ते अरिहंत झाले. त्यांनी धर्माचे उपदेश दिले शेवटी कैलास पर्वतावर जाऊन ध्यानधारणा केली व तेथून निर्वाण प्राप्त केलं व मोक्षपद मिळवलं.
  2. श्री अजितनाथ भगवान
  3. श्री संभवनाथ भगवान
  4. श्री अभिनंद भगवान
  5. श्री सुमतिनाथ भगवान
  6. श्री पद्मप्रभ भगवान
  7. श्री सुपार्श्वनाथ भगवान
  8. श्री चंद्रप्रभ भगवान
  9. श्री पुष्पदंत भगवान
  10. श्री शीतलनाथ भगवान
  11. श्री श्रेयांसनाथ भगवान
  12. श्री वासुपूज्य भगवान
  13. श्री विमलनाथ भगवान
  14. श्री अनंतनाथ भगवान
  15. श्री धर्मनाथ भगवान
  16. श्री शांतिनाथ भगवान
  17. श्री कुन्थुनाथ भगवान
  18. श्री अरहनाथ भगवान
  19. श्री मल्लीनाथ भगवान
  20. श्री मुनिसुव्रतनाथ भगवान
  21. श्री नमीनाथ भगवान
  22. श्री नेमीनाथ भगवान
  23. श्री पार्श्वनाथ भगवान -

दिगंबर आणि श्वेतांबर परंपरेनुसार २३वे तीर्थंकर यांची शासन देवता पद्मावती ही होय. दोन हातांच्या प्रतिमेत अथवा नमस्कार मुद्रा या स्थितीत पद्मावती दिसते.

  1. श्री वर्धमान महावीर भगवान
Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads