डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्लिश भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.
Remove ads
ग्रंथसंपदा सूची
ग्रंथ-पुस्तके आणि प्रबंध
टाचणे, पुरावे आणि निवेदने
शोधपत्रे, लेख, पुस्तकांची पुनरावलोकने
प्रस्ताविक आणि अग्रलेख
Remove ads
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने इंग्रजी भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल १९७९ रोजी झाले होते.
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.[४] या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
Remove ads
प्रकाशित झालेले लेख
विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादींमधे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झालेले काही लेख खालीलप्रमाणे आहेत.
- हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)
- बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)
- फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)
- बुद्धिझम अँड कम्यूनिझम (१९५६)
पत्रकारिता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला इ.स. १९२० मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. इ.स. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. “पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.
पत्रकार व संपादक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली वृत्तपत्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्लिश भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
स्फूट लेखन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने 'बहिष्कृत भारतात' आढळते. 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारतात' स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या इ.स. १९२७ सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात आजकालचे प्रश्न या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले.
बाबासाहेब हे एक उत्तम व प्रभावी वक्ते होते, त्यांची भाषणे नेहमी तर्कशुद्ध व विद्वत्तापूर्ण असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवरील केलेली शेकडो भाषणे सुद्धा त्यांच्या साहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ५३७ पेक्षाही अधिक भाषणे केलेली आहेत यातूनही त्यांचे विचार स्पष्ट होतात. सामाजिक भाषणे, राजकिय भाषणे, आर्थिक विषयावर भाषणे, धार्मिक भाषणे, संविधान सभेतील भाषणे, शेतकरी-कामगारांविषयीची भाषणे, स्त्रियांविषयी भाषणे अशाप्रकारच्या अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी भाषणे केलेली आहेत.
Remove ads
पत्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली पत्रे सुद्धा त्यांचा साहित्याचा एक भाग आहेत. त्यांनी लिहिलेल्या हजारों पत्रांतून त्याचे विचार स्पष्ट झालेले आहेत. बाबासाहेबांची पत्रे इंग्रजी, मराठी व काही इतर भाषेत आहेत.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची संकेतस्थळे
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads