निजामशाही

From Wikipedia, the free encyclopedia

निजामशाही
Remove ads

तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर

Thumb
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)

अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी बादशाह मलिक अहमद यांनी जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

स्थापना

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्यांची बहामनी सुलतानाच्या सरदाराची, बिदर या शहरात दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्यांच्या मुलाने - अहमदा शहाने - बहामनी सल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

मे २८, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद निजाम-उल-मुल्का यांनी बाग ए निजाम ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्यांनीआपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि नवीन शहराचे अहमदनगर असे नाम केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्यांच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. सुलताना चांद बिबी ह्या हुसेन निजाम शहा यांच्या मुलीने आणि अली आदिलशाह यांच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हे कर्तृत्त्ववान प्रधान मंत्री (वजीर ए आजम)मूर्तझा निजामा यांच्या सेवेत होते. मलिक अंबर यांच्या मृत्यूनंतर शहाजी राजे यानी 6 वर्ष मुघल, व आदिलशाह यांना यशस्वी झुंज दिली. शहाजी राजानी त्या वेळी आदिलशहाला मुघलांच्या साम्राज्य विस्तार निती विषयी सावध करून,दक्षिणी राज्य निजामशाही वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. पण आदिलशाह व मुघल यांना निजामशाही संपवून वाटून घ्यायची घायी झालेली होती. तसेच दुसऱ्या मुर्तझा निजामा‌‌ यांच्या आई ना पण स्वतःच्या मुलाचा जीव प्रिय असल्यामुळं त्यांनी मुघलांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुंच शहाजी राजाचा नाईलाज झाला. अशा प्रकारे निजामशाहीचा शेवट झाला.

Remove ads

घराणे

या सलतनीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.

अधिक माहिती नाव, कार्यकाळ (इ.स.) ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads