पर्वती मंदिर सत्याग्रह
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
पर्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्यातील पर्वती मंदिर प्रवेशासाठी इ.स. १९२९ मध्ये केला गेलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह होता. पुण्यातील 'पर्वती टेकडीवरील मंदिर' हे अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा अमरावती नंतरचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील आंबेडकरांच्या वतीने एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून ट्रस्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम.एम.जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads