भागवत पुराण

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

भागवत पुराण (Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa) श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात[] हा एक कृष्ण भक्तिग्रंथ आहे

जलद तथ्य

भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय. या पुराणात, भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत.[] या पुस्तकात, भक्ती योग,आध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे.

Remove ads

भागवत पुराणात सांगितलेली धर्माची तीस लक्षणे

सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्‍नांचे उलटेच फळ मिळते असा विचार, मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप, प्राण्यांमध्ये आणि विशेषेकरून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणे, संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परम धर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात. (८-१२)

Remove ads

एकश्लोकी भागवत पुराण

॥ एकश्लोकी भागवतम् ॥
आदौ देवकिदेविगर्भजननं गोपीगृहे वर्धनम्
मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।
कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतां पालनम्
एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ।
इति श्रीभागवतसूत्र ॥

'भागवत' हे नाव असलेली आणखी दोन पुराणे उपलब्ध आहेत :

  1. देवी भागवत आणि
  2. श्रीमद भागवत

भागवत पुराण ग्रंथाच्या आवृत्ती

  • सनातन गोस्वामी (बृहद्विष्णवतो)
  • संत एकनाथ (एकनाथी भागवत; १६ व्या शतकातील मराठी भाषेचा उत्कृष्ट नमुना)

संदर्भ :

  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (८-१२)

भागवतावरील मराठी पुस्तके

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads