भीमगीत

From Wikipedia, the free encyclopedia

भीमगीत
Remove ads

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला भीमगीत म्हणले जाते. भीम गीताला जयभीम गीत, आंबेडकर गीत किंवा आंबेडकरवादी गीत असेही म्हणतात. भीम गीताच्या माध्यमातून आंबेडकरांचे कार्य, त्यांचे विचार आणि महत्त्व मांडले जाते. आजघडीला विविध भाषेत हजारो भीमगीते उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी अनेक भीमगीते प्रदर्शित होत असतात. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत, तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहीर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगीते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० पेक्षा अधिक भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सवांमध्ये वाजवली जातात.[][][][][][][]

Thumb
जाफ्राबाद मधील आंबेडकर जयंती महोत्सवातील कार्यक्रमात भीमगीत गायन करताना गायक आदर्श शिंदे, १० एप्रिल २०१८.
Remove ads

काही लोकप्रिय भीमगीते

  • उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे
  • माझ्या जातीचं जातीचं
  • जरी संटकाची काळ रात होती
  • कायदा भिमाचा अन् फोटो गांधीचा
  • भीमराव कडाडला
  • माझ्या भिमाची पुण्याई - अंगठी सोन्याची बोटाला
  • भीमराव एकच राजा
  • जय जय भीम बाबा जय भीम (चित्रपट गीत: शुद्रा: दी रायझिंग)
  • भीम अमृतवानी
  • तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे
  • गांधी सावरकर ते टिळक आगरकर
  • सोनीयाची उगवली सकाळ
  • बाबासाहेबांची रिंगटोन
  • हे पाणी आणले मी
  • भिमजयंती १२५
Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads