भुसावळ

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

भुसावळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जलद तथ्य

भुसावळ हे गाव उत्तर महाराष्ट्रात येते. भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक आहे. मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळहून निघतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे. येथे आशिया खंडातले रेल्वेचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण (लोकोमोटिव्ह यार्ड) आहे. भुसावळ शेजारीच दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक [] विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळ हे गाव तापी नदीशेजारी वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे. भुसावळ हे 21°02′50.56″N 75°47′15.99″E वसलेले आहे. त्याची सरासरी उंची २०९ [ ६८५ फूट ] मीटर आहे . भुसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे, आणि हा तालुका राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेला आहे. जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथून अवघ्या ६० किलो मीटर अंतरावर आहे. भुसावळची इंग्लिश मधील स्पेलिंग [ Bhusawal & Bhusaval ] Central Goverment India आंनी नगरपालिकेने वापरली आहे .

Remove ads

लोकसंख्या आणि साक्षरता.

भुसावळची लोकसंख्या २०४,०१६ {२ लाख चार हजार सोळा} आहे . त्यात पुरुष प्रमाण १०५,१६४ आणि महिला ९८ ,८५२ आहेत . भुसावळचे साक्षरता प्रमाण हे ९०.५३% आहे जे भारतातल्या शहरी साक्षरतेच्या ८५% पेक्षाही जास्त आहे. साक्षरतेचे पुरुष आणि महिला प्रमाण हे ९४.९४% आणि ८५% अनुक्रमे आहे .

नद्या

भुसावळ हे तापी नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. तापी नदी भारतातील एक प्रमुख नदी असून तिची लांबी ७२४ किलोमीटर इतकी आहे . तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल येथे होतो. नर्मदा आणि तापी ह्या नद्या पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात.

रस्ता

भुसावळ हे शहर हायवे ४२ वर स्थित आहे. वरणगाव रोड, खडका रोड, साक्री फाटा जामनेर रोड, जळगाव रोड हे देखील खूप व्यस्त रोड्स आहेत . भुसावळच्या बाहेर जाण्यासाठी एकून चार रस्ते आहेत. नाशिक इथून फक्त साडे तीन तासांच्या अंतरावर आहे आणि जळगाव अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे जे भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्यांचे घर आहे. शेगाव येथून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

रेल्वेमार्ग

भुसावळ रेल्वे स्थानक देशातील सगळ्या मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads